'दंगल'मुळे स्माॅल स्क्रीन थिएटर्सला फायदा

'दंगल'मुळे स्माॅल स्क्रीन थिएटर्सला फायदा

  • Share this:

dangal

23 जानेवारी : आमिर खान म्हटलं तर काहीतरी वेगळं , काहीतरी चांगलं हे ओघानंच आलं. त्याच्या दंगलनेही असंच काहीसं नवीन आणि काहीसं चांगलं लोकांना दिलं. देशभरातल्या काही सिंगल स्क्रिन थिएटर्स मालकांनी आमिर खान आणि दंगल टीमचे आभार मानलेत. हे सिंगल स्क्रिन थिएटर्स मल्टिप्लेक्स आणि मॉल्समुळे बंद होण्याच्या मार्गावर होते. मात्र दंगल चित्रपटाने त्यांना त्यांचा गेलेला प्रेक्षकवर्ग पुन्हा मिळवून दिला.

जिकडे त्यांचा गल्ला 8 ते 10 हजारात असायचा तोच आत्ता दंगलमुळे दीड - दोन लाखात गेला. ही त्यांची वर्षभराची कमाई आहे, जी त्यांना एका चित्रपटातून मिळाली आहे. त्यापूर्वी ही थिएटर्स स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडत होती.त्यांच्या मालकांकडे थिएटर कसं चालवावं हा प्रश्न होता. काही तर पूर्ण बंद व्हायच्या मार्गावर होती मात्र दंगलमधून त्यांना किमान कमाई मिळायला लागली आहे, त्यामुळे या थिएटर्सच्या मालकांनी आमिर खानला पत्र लिहून त्याचे आभार मानले.

गझियाबादच्या मधुबन थिएटरचे मालक म्हणतात, 'आमची चित्रपटगृह बंद होण्याच्या मार्गावर होती. तुमच्या चित्रपटावर विश्वास ठेवून आम्ही ती डिजिटल केली. जिकडे इतर चित्रपट 8 ते 10 हजारांपर्यंत गल्ला जमवत होते तिकडे दंगलने आम्हाला जवळपास पावणेदोन लाखांचं कलेक्शन मिळवून दिलं. म्हणून आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अशा चित्रपटांची निर्मिती करावी , जेणेकरून आमच्यासारख्या सिंगल स्क्रिन चित्रपटगृहांच्या कामगारांचा रोजगार नीट चालेल.'

आमिर खानने जेव्हा हे पत्र वाचलं तेव्हा तो भावुक झाला. आपण अशाच प्रकारचे सिनेमे बनवू,असं तो म्हणतोय. आत्ता 375 करोडची कमाई करणारा तो एकमेव भारतीय चित्रपट ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 23, 2017, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading