News18 Lokmat

मुंबईचे काँग्रेसचे प्रवक्ते कृष्णा हेगडे भाजपमध्ये

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 23, 2017 11:47 AM IST

मुंबईचे काँग्रेसचे प्रवक्ते कृष्णा हेगडे भाजपमध्ये

kRUSHNA HEGDE

23 जानेवारी : विरोधकांमधल्या सक्षम लोकांना हायजॅक करण्याचा आदेश भाजपा चांगलाच राबवताना दिसतंय. मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रिया दत्त यांचे निकटवर्तीय कृष्णा हेगडे यांनी काल (रविवारी) रात्री उशीरा भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हेगडे भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

रविवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी  कृष्णा हेगडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार आदी नेतेमंडळी यावेळी उपस्थित होती. काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांनी गुंडांना पक्षाची तिकीटं दिली जातायेत. असं सुरू असताना पक्षात कसं राहयचं?, असा सवाल हेगडे यांनी उपस्थित केला आहे. हेगडे यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला धक्का बसल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी हेगडे यांच्या भाजपप्रवेशावरुन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर टीका केली आहे. हेगडे यांच्यासारख्या नेत्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. संजय निरुपम किंवा दुसऱ्या कोणत्याही नेत्याने हेगडे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, अशी टीका कामत यांनी केली आहे. विशेष म्हणजे हेगडे हे संजय निरुपम यांच्या मतदारसंघातूनच येतात असंही त्यांनी नमूद केलं. निरुपम आणि मोहन प्रकाश हे दोघे राहुल गांधी उत्तरप्रदेशमधील निवडणुकीत व्यस्त असल्याचा फायदा घेत पक्षातून नेत्यांना बाहेर काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कोण आहेत कृष्णा हेगडे?

Loading...

कृष्णा हेगडे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचे निकटवर्तीय आणि सर्वसामान्यांना कधीही उपलब्ध असलेला लोकप्रतिनिधी अशी कृष्णा हेगडे यांची ओळख आहे. त्यांनी अनेक वर्ष प्रिया दत्त यांचे पीए म्हणून काम केलं. 2009 विधानसभा निवडणूकीत विलेपार्ले मतदारसंघातून मनसेचे शिरीष पारकर आणि शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या पराभव करत ते आमदार म्हणून निवडून आले होते. पण 2014 च्या निवडणुकीत हेगडे यांचा भाजपचे पराग आळवणी यांनी पराभव केला होता. हेगडे भाजपात दाखल झाल्याने मुंबईतील भाजपची ताकद वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 11:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...