भाजप-सेना स्वबळावरच लढणार?, 'युती'च्या भवितव्याचा आज फैसला

भाजप-सेना स्वबळावरच लढणार?, 'युती'च्या भवितव्याचा आज फैसला

  • Share this:

_91b9e68e-8a68-11e6-b25a-dc2df696e7dd

22 जानेवारी : गेल्या आठवडाभरापासून चर्चेच्या जोर बैठका होऊनही शिवसेना-भाजप युतीचा जांगडगुंत्ता काही सुटलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस उरले असल्यानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज युती बाबतचा फैसला जाहीर करण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यात आज ते निर्णायक भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सायंकाळी 6 वाजता माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे भाषण करणार आहेत. या भाषणात जागावाटपावरून दोन्ही पक्षात सुरू असलेल्या 'मानापमान' नाटकावर उद्धव ठाकरे पडदा टाकतात की, स्वबळाचं रणशिंग फुंगणार, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यातील महापालिका आणि जिल्हापरीषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या चार दिवस बाकी असताना युतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मुंबईत दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या तीन बैठका झाल्या, पण मुंबई महापालिकेतील जागावाटपाच्या प्रश्नांवर दोन्ही पक्षांचे नेते अडून बसले आहेत. शिवसेनेनं भाजपला फक्त 60 जागा देत राजकारणाची कवळी दाखवल्याचीही चर्चा आहे. त्यावर भाजपची अवस्था एखाद्यानं पानउतारा करावा तशी आहे.

काल दिवसभरात दोनवेळा मुख्यमंत्र्यांकडे भाजप नेत्यांच्या बैठका होऊनही शिवसेनेला भाजपकडून कोणताच निरोप न गेला नाहीये.  जो पर्यंत मुंबई महापालिकेतील जागावाटपाचा प्रश्नं सुटत नाही, तोपर्यंत युती होणं कठिण आहे. त्यामुळे मुंबईत तरी युती होणार नसल्याचं जवळपास आता स्पष्ट झालं आहे.

मात्र युती होणार नसल्याचं जाहीर करून खलनायक व्हायचं नसल्यानं दोन्ही पक्षातील नेते थेट बोलायला तयार नाहीत. आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे युती होणार नसल्याचं थेट तरी सांगतील किंवा शिवसैनिकांना 'कामाला लागा' असं सांगून युती होणार नसल्याचे स्पष्ट संकेत देण्याचे चिन्हं आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2017 08:46 AM IST

ताज्या बातम्या