22 जानेवारी: मुंबईत युतीबाबत काही निर्णय होण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. उलट आता भाजप शिवसेनेत आता मानापमान नाट्य रंगू लागलंय. शिवसेनेनं 60 जागांचा प्रस्ताव ठेवून भाजपचा अपमान केल्याचा आरोप आशिष शेलारांनी केलाय. त्यामुळे आता युतीचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं शेलार यांनी सांगितलंय.
दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला 60 जागा देऊन सन्मानच केल्याचं सांगितलंय. भाजपला खरं तर 50 ते 55 जागा द्यायला हव्यात असा टोलाही संजय राऊतांनी लगावलाय.
किरीट सोमय्यांसारख्या लोकांनी युतीत खोडा घातल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलाय.
युती होणारच नाही हे आता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गृहित धरलंय. आता फक्त युती तुटल्याचीच घोषणा होणं बाकी राहिलंय अशी चर्चा मुंबईत नाक्यानाक्यावर रंगलीये.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा