नाम फाऊंडेशनतर्फे जवानांना मदत

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 22, 2017 07:54 PM IST

नाम फाऊंडेशनतर्फे जवानांना मदत

nana new

22 जानेवारी : जवानांना चांगलं खायला मिळत नाही, ही घटना तुरळक आहे. मुलांपेक्षा चांगला सांभाळ लष्कराकडून केला जातो, अशी टिप्पणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शनिवारी वसंतोत्सवात केली.

गेल्या वर्षभरात शहीद झालेल्या ३०६ जवानांच्या कुटुंबांना नाम फाउंडेशनतर्फे अडीच लाख देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. 'गेल्या वर्षी शेतकर्यांच्या कुटुंबांना मदत करता आली. हे काम थांबणारे नाही. जमलेल्या साठ कोटी रुपयातील काही कोट रुपये शिल्लक आहेत. त्यातून जवानांच्या कुटुंबांना मदत करणार आहे. पैसे लागले तर लोकांकडे हक्काने मागेन.'

आपण रसिक स्वरांनी न्हाहतो पण तिकडे सीमेवर जवान बेसुरांशी लढतात म्हणून आपण सुरक्षित असतो, अशी टिप्पणी नाना यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2017 07:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...