समाजवादी पक्षाचा जाहीरनामा! महिलांना प्रेशर कुकर तर विद्यार्थ्यांना लॅपटॉप

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 22, 2017 06:20 PM IST

समाजवादी पक्षाचा जाहीरनामा! महिलांना प्रेशर कुकर तर विद्यार्थ्यांना लॅपटॉप

sadassdaasasy

22 जानेवारी : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळीच काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. स्मार्टफोनपासून ते लॅपटॉपर्यंत आणि गृहिणींना प्रेशर कुकरपासून ते गरिबांना निवृत्ती वेतनापर्यंत ‘सर्व काही’ देण्याचं वचन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दिलं आहे.

या कार्यक्रमाला मुलायमसिंह यादव आणि शिवपाल यादव यांची मात्र अनुपस्थिती होती. आझम खान त्यांची समजूत काढण्यासाठी घरी गेले होते, तरीही ते आले नाहीत. अखेर अखिलेश यांनी त्यांच्या अनुपस्थितीत जाहीरनामा लोकांसमोर सादर केला.

दरम्यान, तीन वर्षांत 'अच्छे दिन' दिसले नाहीत, विकासही झाला नाही. उलट, विकासाच्या नावाने हातात झाडू देण्यात आला आणि योगासनं करायला लावली गेली. याउलट समाजवादी सरकारनं सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचा विकास केला आहे, अशा शब्दांत अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं.

जाहीरनाम्यातील मुख्य घोषणा

Loading...

 • एक कोटी लोकांना दरमहा हजार रुपये पेन्शन
 • गरीब महिलांना मोफत प्रेशर कुकर
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोन
 • अल्पसंख्याकांसाठी कौशल्य विकास योजना
 • मजुरांना सवलतीच्या दरात मध्यान्ह भोजन
 • ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम
 • जनावरांवरील उपचारांसाठी अॅम्ब्युलन्स सुविधा
 • कुपोषित बालकांना एक किलो तूप, एक किलो दूध पावडर
 • शहराप्रमाणेच गावांतही २४ तास वीज
 • समाजवादी किसान कोष तयार करणार
 • एसटी प्रवासात महिलांना अर्धे भाडे
 • जिल्हा मुख्यालय चौपदरी रस्त्याने जोडणार
 • नव्या उद्योजकांसाठी स्टार्ट-अप योजना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2017 06:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...