News18 Lokmat

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं ट्विटरवरून शानदार स्वागत

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 22, 2017 01:52 PM IST

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं ट्विटरवरून शानदार स्वागत

trump

22 जानेवारी : डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी पार पडला. या सोहळ्यानंतर त्यांना अमेरिकन जनतेने आपले राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वीकारल्याचं दिसतंय. त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवर त्यांचे फॉलोअर्स दीड कोटींनी वाढले.त्यांचं स्वागतच अमेरिकेने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं.

ते अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. याशिवाय काल राष्ट्राध्यक्ष होताच त्यांना त्यांचं ऑफिशिअल ट्विटर हॅन्डल @POTUS देऊ केलं गेलं. यानंतर त्यांनी त्यावरून पाच ट्विटस् केले. त्यावरून त्यांच्या शपथविधीच्या भाषणाची फेसबुक लिंक शेअर केली गेली. या नव्या ट्विटर हॅन्डलला जवळपास दीड कोटी लोकांनी फॉलो केलं. हे ऑफिशिअल अकाउंट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं होतं. यावरून ओबामा यांनी केलेली ट्विटस् आत्ता सुरक्षितरित्या @POTUS44 या हॅन्डलवर ठेवले आहेत.

ट्रम्प यांनी केलेल्या ट्विट्सपैकी एका ट्विटला 18,000 लोकांनी रिट्विट केलं. त्यात त्यांनी कुटुंबियांतर्फे सर्वांचे आभार मानलेत. त्यांच्या शपथविधीसोबतच सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पडल्या .त्यात काहींनी आनंद व्यक्त केला तर काहींनी अमेरिकच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली. ट्रम्प यांचा स्वीकार अमेरिकन्सनी जसा केलाय तशीच कामं त्यांच्याकडून व्हावीत, अशा त्यांना शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2017 12:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...