युतीबाबत निर्णय घेण्यासाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक

  • Share this:

cm devendra fadanvis4

22 जानेवारी :   शिवसेना भाजप युतीबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी भाजपची आज रविवारी एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीला मुंबई भाजप आणि राज्यातील भाजपचे सर्व प्रमुख नेते हजर राहणार आहेत.

भाजपचा 114 जागांचा फॉर्म्युला शिवसेना मान्य नाहीये. अशा परिस्थितीत स्वबळावर निवडणूक लढावी का? या निष्कर्षावर भाजप आला आहे. मुंबई महानगर पालिकेत शिवसेना सोबत युती करावी अशी  भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची इच्छा आहे. हे पाहता मध्यस्थीचा मार्ग म्हणून 90-95 जागा बाबतचा अंतिम प्रस्ताव भाजप मुख्यमंत्रीच्या माध्यमाने शिवसेना समोर ठेवला जाईल. मात्र या प्रस्तावाला शिवसेना नाकारला तर युती होणार नाही, हे आज रात्री स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2017 09:17 AM IST

ताज्या बातम्या