स्वच्छ भारत मोहिमेत टॉप-20 मध्ये आणण्यासाठी लाच, तिघांना अटक

स्वच्छ भारत मोहिमेत टॉप-20 मध्ये आणण्यासाठी लाच, तिघांना अटक

  • Share this:

aurangabad1

22 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वकांक्षी स्वच्छ भारत मोहिमेला बदनाम करणारी घटना औरंगाबादेत घडली आहे. केंद्र सरकारकडून स्वच्छता अभियानाची पाहाणी करण्यासाठी आलेले 3 अधिकारी औरंगाबादच्या लाच लुचपत विरोधी पथकाच्या जाळ्यात अडकलेत.

औरंगाबाद शहराला या अभियानात पहिल्या 20 शहरांच्या यादीमध्ये दाखवण्यासाठी या परिक्षकांनी चक्क अडीच लाखाची मागणी केली. पैसे नाही दिले तर औरंगाबाद शहर स्वच्छ शहराच्या यादीत येणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली.

याप्रकरणी औरंगाबाद महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी लाच लुचपत विरोधी पथकाकडं याची तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून पाहाणी पथकाचे प्रमुख शैलेंद्र बदामियाला 1 लाख 70 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

न्यू स्टार डॅाट कॅाम या खाजगी कंपनीकडं केंद्र सरकारनं शहरांच्या स्वच्छ भारत मोहिमेच्या पाहणी करण्याची जबाबदारी दिली होती. त्याच कंपनीशी हे तिन्ही अधिकारी निगडीत आहेत. या तिन्ही आधिकाऱ्यांच्या राहाण्याची व्यवस्था एका पंचतारांकित हॅाटेलमध्ये मोठी रक्कम देवून पालिकेच्या वतीनं करण्यात आली. एवढच नाही तर हे अधिकारी रोज 25 हजाराची दारू पीत असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेला लाचखोर अधिकाऱ्यांमुळे गालबोट लागलं आहे.

या अधिकाऱ्यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड, नांदेड, हिंगणघाट, वर्धा या ठिकाणी तपासणी केली आहे. औरंगाबादनंतर या अधिकाऱ्यांचा नाशिक दौरा होता. मात्र केंद्र सरकारच्या अश्या लाचखोर परिक्षकांमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना आता वादाच्या भोव-यात सापडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2017 09:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading