शिवसेना-भाजपची युती तुटल्यात जमा !

शिवसेना-भाजपची युती तुटल्यात जमा !

  • Share this:

yuti_meeting

21 जानेवारी : गेल्या आठवड्याभरापासून युतीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या चर्चेच्या गुऱ्हाळातून अखेरपर्यंत काही निष्पन्न झालं नाही. भाजप 114 जागावरुन मागे हटायला तयार नाही तर सेना 60 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे आता युती तुटल्यात जमा असल्याचं जवळपास चित्र स्पष्ट झालंय.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन बैठकातून काही निष्पन्न झालं नाही डेडलाईनही डेड झाली. अखेर आज तिसरी बैठक पार पडली खरी पण यातूनही काही हाती आलं नाही. शिवसेना- भाजप यांच्यातील युतीबाबतची बैठक कोणत्याही निर्णयाविना संपलीय. युतीबाबत यानंतर वरिष्ठ नेतेच निर्णय घेणार असल्याचा निर्णय या बैठकीनंतर घेण्यात आलाय.

भाजप 114 जागा लढण्यावर ठाम असला तरीही सेनेने भाजपला फक्त 60 जागा सोडण्याची तयारी दर्शवलीय. त्यामुळे युतीबाबत पुढे बोलणं अशक्य झाल्यामुळे आता याबाबत वरिष्ठ नेतेच योग्य निर्णय घेतील असा सूर या बैठकीअंती उमटलाय. विशेष म्हणजे, भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केलीय. भाजपनं आपल्या 227 उमेदवाराची चाचपणी सुरु केलीय. त्यामुळे युती आता होणार नाही असंच दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 21, 2017, 8:16 PM IST

ताज्या बातम्या