९७वं नाट्य संमेलन उस्मानाबादला होणार

  • Share this:

natya samelan21 जानेवारी : यंदा होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या यजमानपदाची संधी उस्मानाबादला मिळणार आहे. 7,8, 9 एप्रिलदरम्यान संमेलन रंगणार आहे अशी घोषणा नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी केलीये.

नाट्य परिषदेचे यजमानपद उस्मानाबाद  मिळावे यासाठी परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे यापूर्वीच रितसर मागणी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दिपक करंजीकर, दिलीप कोरके, दिपक वेलणकर यांनी उस्मानाबादला भेट देवून संमेलनाच्या नियोजित स्थळांची पाहणी केली.

संमेलनासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेवून निवास, भोजन आदी व्यवस्थांबाबत स्थानिक शाखेच्या पदाधिकारी प्रतिष्ठीत नागरिक ,पत्रकार, शहरातील कलाकार यांच्याशी संवाद साधला. अखेरीस उस्मानाबादेतच साहित्य संमेलन होणार यावर शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे अनेक वर्षांपासून नाट्य संमेलनासाठी उत्सुक असलेल्या उस्मानाबादकरांना लवकरच स्वप्नपूर्तीचा आनंद मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2017 08:00 PM IST

ताज्या बातम्या