News18 Lokmat

युवराजचं शतक होईपर्यंत झळकली तब्बल 409 शतकं !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 21, 2017 06:04 PM IST

युवराजचं शतक होईपर्यंत झळकली तब्बल 409 शतकं !

 

21 जानेवारी : इंग्लंडविरुध्दच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवराजने केलेली दीडशतकी खेळी टीकाकारांना मारलेली चपराक होती. त्याच्या टीम इंडियातील समावेशावर प्रश्नचिन्ह उभं करणारे यामुळे शांत बसले. त्यातून त्यांची धावांची भूक दिसली. त्याच्या खेळीने त्याने इंग्लंडच्या बॉलर्सची दमदार धुलाई केली. मात्र आपल्या या खेळीसाठी प्रेक्षकांना खूप वाट पाहायला लावली,हेही खरंय. त्याच्या या सहा वर्षांच्या कालावधीत क्रिकेट चाहत्यांनी तब्बल 409 शतकी खेळी पाहिल्यात.

त्याने या शतकासाठी चाहत्यांना सहा वर्ष वाट पाहायला लावली. त्याची ही खेळी सर्वच फलंदाजांपैकी इंग्लडविरुद्धची मोठी खेळी ठरली. यापूर्वी त्याने 2011च्या वर्ल्ड कपदरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध 113 धावांची धुंवाधार खेळी केली होती. या दोन शतकांमध्ये जवळपास 5 वर्ष 9 महिने आणि 30 दिवसांचा कालावधी गेला. या वर्ल्डकपनंतर त्याने 17 डावांत दोन अर्धशतक बनवले. युवराजच्या या दोन शतकांदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काय काय घडलं ते पाहुयात.

1. दरम्यान आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये 409 शतकी खेळ्या खेळल्या गेल्या.

2. एकट्या विराट कोहलीने 22 शतकं झळकावली.

Loading...

3.14 भारतीय फलंदाजांनीसुद्धा आपली शतकं बनवली.

4. या दोन शतकांदरम्यान एक नव्हे तर तब्बल दोन द्विशतक बनवली गेली.

5. 26 नवीन भारतीय क्रिकेटर्स यादरम्यान टीम इंडियाला मिळाले.

6.जगभरात वेगवेगळ्या देशांत तब्बल 62 कर्णधार बदलले गेले.

7. सचिन तेंडुलकर, मायकल क्लार्क, वीरेंद्र सेहवाग, शेन वॉट्सन, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, डॅनियल वेट्टोरी, ग्रीम स्मिथ, झहीर खान, ब्रेट ली यांसारख्या अनेक दिग्गजांनी क्रिकेटला अलविदा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2017 05:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...