21 जानेवारी : शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आज संध्याकाळी ५ वाजता तिसरी बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाबाबत प्रस्ताव दिले जाणार आहे आणि उद्या यावर निर्णय़ होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे शिवसेनेनं दिलेली डेडलाईन पुढे ढकलली जाणार आहे.
महापालिका निवडणुकीत युतीसाठी गेल्या आठवड्याभरापासून शिवसेना आणि भाजपमध्ये बैठका सुरू आहे. पण, अजूनही कोणता निर्णय झाला नाही. आज सेनेनं दिलेली डेडलाईन संपत आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा युतीची बैठक होणार आहे.
संध्याकाळी 5 वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा हॅाटेलमध्ये ही महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीत युती संदर्भात जागावाटप या एकाच विषयावर चर्चा होणार आहे. आज दोन्ही पक्ष एकमेकांना आपले जागावाटप प्रस्ताव देणार आहेत. या प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी दोन्ही पक्षांना आणखी एक दिवस लागणार आहे. त्यामुळे युतीची डेडलाईन पुढे ढकलली जाणार आहे. आणि आज चर्चा यशस्वी झाली, तरच राज्यात युतीची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv