पाकच्या ताब्यात असलेले चंदू चव्हाण मायदेशी परतणार

  • Share this:

cHANdu chavan21 जानेवारी : भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमी तणावपूर्ण परिस्थिती असते. आता या परिस्थितीतून सुखद अशी घटना घडलीये. चुकून पाकिस्तानामध्ये गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण यांची घरवापसी होणार आहे. वाघा बॅार्डरवरुन चंदू चव्हाण आज दुपारी भारतात प्रवेश करणार आहे.

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे लष्कराच्या कामगिरीचं कौतुक होत होतं. पण याच काळात चंदू चव्हाण हे जवान चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. चंदू चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात आहेत, असा दुजोरा पाकिस्तानच्या डीजीएमओंनी दिली होता.

चंदू चव्हाण हे मूळचे धुळ्याचे रहिवासी आहेत. चंदू चव्हाण चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याचं कळल्यामुळे त्यांच्या आजीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू ओढवला होता. चंदू चव्हाण परत येत नाहीत तोपर्यंत त्यांच्या आजीच्या अस्थींचं विसर्जन करायचं नाही, असं त्यांच्या कुटंुबीयांनी ठरवलं होतं. चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी भारताचे लष्करी अधिकारी आणि परराष्ट्र मंत्रालयाचे केले होते. आता या प्रयत्नांना यश आलंय. चंदू चव्हाण आज भारतात परतणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 21, 2017, 2:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading