जल्लीकट्टूचे राज्यात पडसाद, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी रास्ता रोको

जल्लीकट्टूचे राज्यात पडसाद, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी रास्ता रोको

  • Share this:

bailgada421 जानेवारी: जल्लीकट्टूसाठी तमिळनाडूमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रतही उमटू लागले आहेत. राज्यात बैलगाड़ा शर्यतीवरील बंदी तत्काळ उठवा ह्या मागणीसाठी आज पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाड़ा मालक एकत्र येऊन आंदोलन करतायत.

बैलगाडा मालकांनी पुणे नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन केलंय पुण्याजवळील चाकण शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर हे आंदोलन सुरू आहे . बैलगाड़ा शर्यातीवर घातलेली बंदीच्या विरोधात संताप व्यक्त करत आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बैलांसह पुणे नाशिक महामार्ग अडवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण येण्याची शक्यता लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2017 02:21 PM IST

ताज्या बातम्या