भाजपचा स्वबळाचा नारा, 512 उमेदवारांची यादी तयार

  • Share this:

bjp-pradarshan21 जानेवारी : युती होईल तेव्हा होईल पण भाजपने आता स्वबळाचा नारा दिलाय. मुंबई भाजपची मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 512 उमेदवारांची प्राथमिक यादी तयार झालीये. निवडणूक समितीनं तीन दिवस 20 तास बैठक घेऊन 512 नावे वॉर्डनिहाय चर्चा करून यादी तयार केलीय. अंतिम यादी तयार करण्याचे अधिकार मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना देण्यात आले आहे.

भाजपकडे 2500 इच्छुकांचे अर्ज आले होते. त्या पहिली चाळण लावून 1769 यादी करण्यात आली. त्या नावांचा विचार करून समितीने 512 नावांची यादी तयार केली. काल रात्री ३ वाजता समितीची बैठक संपली. प्रत्येक वॉर्डासाठी २ ते ३ उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यात आलेत. युतीचा निर्णय झाल्यावर अंतिम यादी तयार होईल आणि शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीकडे पाठवण्यात येईल.

तर दुसरीकडे आज युतीच्या चर्चेची आज डेडलाईन आहे. आज शेवटच्या दिवशी कोणताही चमत्कार होण्याची शक्यताही नाही आहे. त्यामुळे युती 'डेड' झाल्याची घोषणा कोण करतंय हेच आता पहावं लागणार आहे. आयबीएन लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार एकमेकांवर टीक न करता, फक्तं जागावाटप संदर्भात बैठक होणार असेल, तरच शिवसेना नेते युतीच्या बैठकीला तयार आहेत. असा निरोप भाजप नेत्यांना कळविण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2017 12:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading