नाशिकमध्ये शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराची निर्घृण हत्या

नाशिकमध्ये शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराची निर्घृण हत्या

  • Share this:

nashik_murder21 जानेवारी : नाशिकमध्ये शिवसेना इच्छुक उमेदवार सुरेंद्र उर्फ घाऱ्या शेजवळ यांची अज्ञातांनी निर्घृण हत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशिक रोड येथील त्रिवेणी पार्कमध्ये शुक्रवारी अज्ञातांनी त्याच्या कार्यालयात घुसून त्याच्यावर हल्ला केला.

सुरेंद्र घाऱ्या शेजवळ यांची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीये. सुरेंद्र शेजवळच्या हत्येमागे राजकीय कारण नाहीय, असं पोलीस सांगत आहेत. खुनाचा बदला घेण्यासाठी सुरेंद्रची हत्या झाली असावी, असा अंदाज पोलीस व्यक्त करत आहे. या प्रकरणी ४ संशयित आरोपींची नावं पोलिसांनी निश्चित केलीयेत. त्यांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी रात्री १० वाजता सुरेंद्रची निर्घृण हत्या करण्यात आली. आगामी निवडणुकांसाठी सेनेकडून तिकीट मिळवण्यासाठी तो इच्छुक होता. १५ दिवसांपूर्वीच त्यानं मनसेमधून सेनेत प्रवेश केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 21, 2017, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading