ट्रम्प यांचा 'अमेरिका फर्स्ट' चा नारा

  • Share this:

donald3421 जानेवारी : शपथविधीच्या भाषणात नवे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी 'अमेरिका फर्स्ट'चा नारा दिला. अमेरिकन नागरिकांच्या हिताला माझं सर्वात जास्त प्राधान्य असेल, असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेमधली गरिबी आणि बेरोजगारी संपवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. ही सत्ता माझी नाही, जनतेची आहे, असंही त्यांनी सांगितलं. अमेरिकन लोकांसाठी नोकरीच्या संधी निर्माण करेन, असं आश्वासनही ट्रम्प यांनी दिलं.

इस्लामिक दहशतवादाचा आपण खात्मा करू, असं सांगायलाही ट्रम्प विसरले नाहीत. त्यासोबतच व्यक्ती कोणत्याही रंगाची असो, सगळ्यांच्या शरीरात लाल रक्त आहे, असं डॉनल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. राजकारणी लोकं फक्त बोलतात पण मी काम करेन, असंही डॉनल्ड ट्रम्प यांनी अमोरिकन जनतेला सांगितलं. अमेरिकेत वॉशिंग्टन डी.सी. पुरतीच सत्ता मर्यादित न राहता सत्तेचं विकेंद्रीकरण केलं जाईल, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2017 12:01 AM IST

ताज्या बातम्या