आमची आघाडी होणार नाही, प्रफुल्ल पटेलांचा खो !

आमची आघाडी होणार नाही, प्रफुल्ल पटेलांचा खो !

  • Share this:

praful_patel320 जानेवारी : राज्यातल्या दहा महापालिकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीत आघाडी होणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. दहा महापालिकांत काँग्रेस राष्ट्रवादीत आघाडी होणार नाही असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय.

नगरपरिषदा निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालं नाही. आता महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने कंबर कसलीये. पण, या आघाडी होणार की नाही हा प्रश्न युतीप्रमाणे अंधातरीत आहे.

आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही आघाडी होणार नसल्याचे संकेत दिले. आघाडी होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच मुंबई महापालिकेसाठीच्या सर्व जागा राष्ट्रवादी जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पटेल यांच्या वक्तव्यामुळे राज्यात ज्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची चर्चा सुरू होती. त्या चर्चेलाही खो बसलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 20, 2017, 9:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading