S M L

...मग राज साहेबांनाच का नाही बोललात?, मनसे शिलेदाराचा दामलेंनाच सवाल

Sachin Salve | Updated On: Jan 20, 2017 06:57 PM IST

...मग राज साहेबांनाच का नाही बोललात?, मनसे शिलेदाराचा दामलेंनाच सवाल

20 जानेवारी : नाशिकच्या कालिदास नाट्यगृहाचे फोटो काल प्रशांत दामलेंनी ट्विट केले. मनसेनं या मुद्यावरून दामलेंना लक्ष्य करायला सुरूवात केलीय. एवढी वर्षं नाशकात प्रयोग करतायेत. मग आधी का नाही बोललात. दामले हे राज ठाकरेंचे मित्र आहेत, मग राज साहेबांना का नाही बोललात असा अजब सवाल मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी फेसबुकवरच्या व्हिडिओमध्ये केलाय.

नाशिकमध्ये मनसेनं खूप कामं केली असल्याचा दावा मनसे आणि खुद्द राज ठाकरेंनी केलाय. काल परवाच मराठी फिल्म इंडस्ट्रीजमधील अनेक दिग्गज कलाकारांनी नाशिकला भेट दिली. आणि मनसेनं नाशिकमध्ये केलेल्या कामाचं प्रचंड कौतुक केलं.  मात्र काल प्रशांत दामलेंनी नाशिकच्या कालिदास नाट्यगृहाची झालेली दुरवस्था समोर आणली. आणि हेच का मनसेचं नवनिर्माण अशा प्रश्न निर्माण झाला.

बुधवारी प्रशांत दामलेंचा 'साखर खाल्लेला माणूस' या नाटकाचा प्रयोग होता. मात्र पालिकेच्या अखत्यारित असलेल्या कालिदास नाट्यगृहाची अवस्था पाहून प्रशांत दामले व्यथित झाले. त्यांनी सोशल मीडियावर नाट्यगृहातील दुरवस्थेचे फोटो टाकत आपला संताप व्यक्त केला. तुटक्या खुर्च्या, खराब बाथरूम, अस्वच्छ ड्रेसिंग रूम, सर्वत्र घाण, उंदरांचा वावर अशा सर्व दुष्टचक्रात हे नाट्यगृह सापडलंय.

दामलेंच्या या सोशल तक्रारीवर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर चांगलेच संतापले. त्यांनी फेसबुकवर व्हिडिअो लाईव्ह करुन एवढी वर्षं नाशकात प्रयोग करतायेत. मग आधी का नाही बोललात असा उलट सवालच विचारला. एवढंच नाहीतर दामले हे राज ठाकरेंचे मित्र आहेत, मग राज साहेबांना का नाही बोललात असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, मनसेचे नाशिक प्रभारी अविनाश अभ्यंकर यांनीही या मुद्द्यावरून प्रशांत दामलेंना लक्ष्य केलंय. कालिदासच्या नुतनीकरणाचा प्लॅन तयार आहे. हा प्लॅन तयार करण्यातही दामलेंचा सहभाग होता. फक्त आचारसंहितेमुळे काम थांबलंय. असं असूनही टीका का..? असा सवाल त्यांनी केलाय. दामलेंना मुंबई ठाण्यातील नाट्यगृहातल्या चुका दिसत नाहीत का असा सवालही अभ्यंकर यांनी विचारलाय.

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 06:57 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close