वरिष्ठांचं ऐका, काँग्रेसच्या बैठकीत निरुपमांना खडसावलं

वरिष्ठांचं ऐका, काँग्रेसच्या बैठकीत निरुपमांना खडसावलं

  • Share this:

 sanjay_nirupam420 जानेवारी : महापालिका निवडणुकीला सामोरं जात असतांना वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांचं मत जाणून घ्या अशी तंबी देत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना काँग्रेस श्रेष्ठींनी चांगलंच खडसावलं.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर कामतांनी नाराजी व्यक्त केली. एवढंच नाहीतर महापालिकेच्या इच्छुक उमेदवार निवडीतून आणि प्रचारातून बाहेर पडत असल्याचं सांगितलं. तरदुसरीकडे नारायण राणेंनीही कामतांच्या नाराजीवर बोलताना कामतांची नाराजी फार काही गंभीर नसल्याचं सांगितलंय.

काँग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीत संजय निरुपम यांना चांगलंच फैलावर घेतलं. या बैठकीत संजय निरुपम यांच्या कार्यशैलीवर नेत्यांची नाराजी व्यक्त केली. निरुपम इतर नेत्यांचं म्हणणं ऐकत नाही, स्वत:च सगळे निर्णय घेतता अशी तक्रार इतर नेत्यांनी केली.

त्यामुळे निरुपम यांच्या नेतृत्व करण्याच्या पद्धतीवरून वरिष्ठ नेत्यांची निरुपम यांना खडसावलं. पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांचं मत लक्षात घेण्यात यावं अशी तंबी वरिष्ठांनी दिली. त्याचबरोबर नारायण राणे आणि गुरुदास कामत यासारख्या नेत्यांचं म्हणणं ऐकण्याचा निरुपम यांना सल्लाही देण्यात आलाय.

राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष यासारख्या समविचारी पक्षांशी आघाडी करुन मत विभाजन टाळण्याचा विचार विचार व्हावा अशी सूचना मिलिंद देवरा, कृपाशंकर सिंह यांनी केली.

खुल्या वॅार्डातून आरक्षणासाठी पात्र उमेदवारांना उमेदवारी न देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.  दोनदा पराभूत झालेल्या उमेदवारांना यंदा उमेदवारी न देण्याचा निर्णय पण अगदी अपवादात्मक परिस्थितीत उमेदवारीची संधी देणार असल्याचंही काँग्रेस नेत्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 06:45 PM IST

ताज्या बातम्या