S M L

एका संघर्षाची अखेर, भैयालाल भोतमांगे यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Jan 20, 2017 06:09 PM IST

एका संघर्षाची अखेर, भैयालाल भोतमांगे यांचं निधन

20 जानेवारी : खैरलांजी हत्याकांडातील एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचं निधन झालं. नागपूरच्या श्री कृष्णा हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. न्यायासाठी भैयालाल भोतमांगे यांनी मोठा संघर्ष केला.  कोर्टाचा निर्णय येण्याआधी त्यांच्या निधनामुळे आज एका संघर्षाचा अखेर झाल्याची भावना दलित समाजातून व्यक्त होत आहे.

29 सप्टेंबर २००६ रोजी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातल्या खैरलांजी गावात राहणाऱ्या भोतमांगे कुटुंबियांवर  गावातल्याच काही लोकांकडून अमानुष हत्या करण्यात आली. आरोपींनी भोतमांगे कुटुंबातील सुरेखा (३८), प्रियंका (१८), सुधीर (२२) आणि अंध रोशन (१८) या चौघांची जातीवाचक शिवीगाळ करून काठय़ा आणि सायकलच्या चेनने मारहाण करून हत्या केली.  महिलांचा विनयभंग करून त्यांचे निर्वस्त्र मृतदेह बैलगाडीत टाकून साडेतीन किलोमीटर अंतरावरील कालव्यात फेकून देण्यात आले. ही घटना घडताना या अमानुष हल्ल्यात एकमेव व्यक्ती वाचली भैयालाल भोतमांगे. भैय्यालाल वाचल्यामुळे सदर हत्याकांड उघडकीस आले.

या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली. घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल 15 सप्टेंबर २००८ रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले.

आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्यांनी लढा दिला. अमानुष अशा हत्याकांडातून बचावलेले भैय्यालाल भोतमांगे यांचं आज निधन झाल्यामुळे दलित संघटनांनी दु:ख व्यक्त केलं. चळवळीत असणारा लढा देणार माणून गेला हे दुर्दैव आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याच्या आधी त्यांचं निधन झाल्यामुळे चळवळीला ही हानी आहे अशी भावना भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 06:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close