S M L

असा असेल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी सोहळा

Sachin Salve | Updated On: Jan 20, 2017 05:29 PM IST

असा असेल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी सोहळा

20 जानेवारी :  अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डॉनल्ड ट्रम्प आज शपथ घेणार आहेत. भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी डॉनल्ड ट्रम्प यांचा शपथविधी होणार आहे. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. मध्ये हजारो अमेरिकन नागरिक जमले आहेत.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि वेळ ठरलेलीच असते. राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी 20 जानेवारीलाच होतो. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधीही 20 जानेवारीलाच झाला होता. अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश नव्या राष्ट्राध्यक्षांना पदाची शपथ देतात.

असा असेल शपथविधी सोहळा

अमेरिकन वेळेनुसार सकाळी 8 : 30

(भारतीय वेळेनुसार संध्या. 7 वा. )

Loading...

डॉनल्ड ट्रम्प सेंट जॉन चर्चमधल्या प्रार्थनेला उपस्थित राहतील.

अमेरिकन वेळेनुसार सकाळी 9 : 30

(भारतीय वेळेनुसार रात्री 8 वा. )

डॉनल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्ये चहापानासाठी जातील.

अमेरिकन वेळेनुसार सकाळी10 :30

(भारतीय वेळेनुसार रात्री 9 वा.)

डॉनल्ड ट्रम्प ओबामा कुटुंबीयांसोबत शपथविधीच्या ठिकाणी जातील.

अमेरिकन वेळेनुसार सकाळी 11:25

(भारतीय वेळेनुसार रात्री 9 : 55)

डॉनल्ड ट्रम्प यांचा शपथविधी होईल.

अमेरिकन वेळेनुसार दुपारी 1 वा.

(भारतीय वेळेनुसार रात्री 11वा. 30 मि.)

राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन व्हाईट हाऊसमध्ये भोजन घेतील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 05:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close