S M L

'रईस'चं प्रमोशन करता येत नसल्याची माहिराला खंत

Sonali Deshpande | Updated On: Jan 20, 2017 05:28 PM IST

'रईस'चं प्रमोशन करता येत नसल्याची माहिराला खंत

20 जानेवारी : शाहरूख खानचा 'रईस' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शाहरूख आणि नवाजुद्दीन या सिनेमाचं मोठ्या थाटामाटात प्रमोशन करतायत. पण या सिनेमाची नायिका माहिरा खान ही पाकिस्तानी असल्यामुळे ती यापासून चार हात लांबच आहे.

पण माहिरा खान ही नाराज आहे. एका पाकिस्तान टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने आपली नाराजी व्यक्त केली. 'या सिनेमासाठी आपणही शाहरूख एवढीच मेहनत केलीय पण आपल्याला प्रमोशनमध्ये सहभागी होता आलं नाही,' असंही तिने सांगितलं.उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना बॅालिवूडमध्ये काम करण्यासाठी प्रचंड विरोध झाला. करण जोहरचा सिनेमा 'ए दिल मुश्कील'मध्ये फवाद खानच्या भूमिकेमुळे पूर्ण देशभर विरोध झाला आणि त्यामुळे फवाद खान आणि काही पाकिस्तानी कलाकार भारत सोडून आपल्या मायदेशी परतले .

अगोदर माहिराला या सिनेमातून काढून टाकलंय अशी बातमी होती,पण सिनेमा अगोदरच पूर्ण झाला होता.फक्त माहिरा प्रमोशनला नसणार, हे आधीच शाहरूख खाननं सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 11:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close