20 जानेवारी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबाआयने आज (शुक्रवारी) हायकोर्टात चौकशी अहवाल सादर केला. सीबीआयने परवानगीशिवाय चौकशी अहवाल सार्वजनिक करू नये, असं हायकोर्टाने सीबीआयला आदेश दिले आहेत.
तर कोर्टाच्या सुनावणीनंतर दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबीयांनी मुंबई हायकोर्टाबाहेर आज निदर्शनं केली. दाभोलकर आणि पानसरे हत्येचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013मध्ये पुण्यात हत्या झाली. त्यीनंतर 16 फेब्रुवारी 2015ला कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात हत्या करण्यात आली. दोन्ही हत्यांमध्ये साम्य असल्याने यामागे एकाच प्रकारची शक्ती असावी असा संशय डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता.
दरम्यान, एखाद्या साध्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सापडतात. मात्र दाभोलरांच्या खुनातील आरोपी सापडत नाहीत का ? असा सवाल अनिसने उपस्थित केला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा