डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्नेहभोजनाला मिका सिंग हजर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्नेहभोजनाला मिका सिंग हजर

  • Share this:

C2lvpWYUkAALWF0

20 जानेवारी : गायक मिका सिंगने नुकतीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्नेहभोजनाला उपस्थिती लावली. आज डोनाल्ड ट्रम्प अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी काल वॉशिंग्टन डी.सी. इथे भोजन समारंभ आयोजित केला होता. त्यात काही खास पाहुण्याना निमंत्रित केलं होतं. भारतीय लोकप्रिय गायक मिका सिंगही त्या जेवणाला उपस्थित होता.

तेथील शाही पाहुणचार पाहून तो भारावून गेला. मिकाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात डोनाल्ड स्वत: भाषण देताना दिसत आहेत. तसंच त्याने गुरुवारच्या या डिनरचे काही फोटोजही शेअर केलेत.

त्यात या रात्रीच्या जेवणाचा थाट दिसून येतोय. या भोजन समारंभाला उपस्थिती लावणं आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं ,मिका सिंगने या पोस्टमध्ये म्हटलंय. तसंच त्याने डोनाल्ड यांची मुलगी इवांका हिच्यासोबत फोटो शेअर केला असून त्यात त्याने 'चांगल्या पाहुणचारा'साठी तिचे आभार मानलेत.

आज रात्री डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. या शपथविधीचा सोहळा राजेशाही असेल , तर सोहळ्यासाठी मोठं बजेट वापरण्यात आल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 10:20 AM IST

ताज्या बातम्या