20 जानेवारी : नाशिकमध्ये मनसेनं खूप कामं केली असल्याचा दावा मनसे आणि खुद्द राज ठाकरेंनी केलाय. काल परवाच मराठी फिल्म इंडस्ट्रीजमधील अनेक दिग्गज कलाकारांनी नाशिकला भेट दिली. आणि मनसेनं नाशिकमध्ये केलेल्या कामाचं प्रचंड कौतुक केलं. मात्र काल प्रशांत दामलेंनी नाशिकच्या कालिदास नाट्यगृहाची झालेली दुरवस्था समोर आणली. आणि हेच का मनसेचं नवनिर्माण अशा प्रश्न निर्माण झाला.
बुधवारी प्रशांत दामलेंचा 'साखर खाल्लेला माणूस' या नाटकाचा प्रयोग होता. मात्र पालिकेच्या अखत्यारित असलेल्या कालिदास नाट्यगृहाची अवस्था पाहून प्रशांत दामले व्यथित झाले. त्यांनी सोशल मीडियावर नाट्यगृहातील दुरवस्थेचे फोटो टाकत आपला संताप व्यक्त केला. तुटक्या खुर्च्या, खराब बाथरूम, अस्वच्छ ड्रेसिंग रूम, सर्वत्र घाण, उंदरांचा वावर अशा सर्व दुष्टचक्रात हे नाट्यगृह सापडलंय.
याआधीही प्रशांत दामले यांनी या नाट्यगृहाच्या दुरवस्थेबद्दल आवाज उठवला होता. मात्र नाशिक महापालिकेने या नाट्यगृहाच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचंच दिसतंय. नाशिकमधल्या कामाचं कौतुक करणाऱ्या कलाकार मंडळींना नाट्यगृहाची अवस्था दिसली नाही का हाही प्रश्न उपस्थित होतोय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा