S M L

मुंबईत युती होण्याची शक्यता धुसर

Sonali Deshpande | Updated On: Jan 20, 2017 10:45 AM IST

 मुंबईत युती होण्याची शक्यता धुसर

20जानेवारी : मुंबईत युती होईल याची शक्यता धुसर होत चाललीय.भाजपकडे २२७ जागांची यादी जवळपास तयार आहे.तर दुसरीकडे युतीच्या बैठकीला जाणार नाही, अशी भूमिका सेनेच्या नेत्यांनी घेतलीय. भाजपचा प्रस्ताव स्वीकारणार नाही, असं शिवसेना नेते अनिल देसाईंनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनीच युतीवर चर्चा करावी, अशी भूमिका बैठकांना जाणाऱ्या नेत्यांनी घेतलीय.हे नाराजीनाट्य कालपासून सुरूय.आशिष शेलार, किरीट सोमय्यांच्या टीकेनं शिवसेना नाराज आहे. आशीष शेलार आणि किरीट सोमय्यांच्या वक्तव्यावर शिवसेनेत तीव्र नाराजी दोनही नेत्यांनी IBNलोकमतशी एक्झक्लुसिव्ह बातचीत केली होती.

शेलार आणि सोमय्या युतीच्या चर्चेत खोडा घालत असल्याचा आरोप सेना नेत्यांनी केला. अनिल देसाई, अनिल परब आणि रवींद्र मिर्लेकर उध्दव ठाकरेंना भेटले आणि अशा स्थितीत चर्चा होणार नाही. अशी टीका थांबत नाही तोपर्यंत चर्चा नाही. असंच असेल तर फडणवीसांनी थेट उध्दव ठाकरेंशी चर्चा करावी अशी भूमिका शिवसेनेनं मांडली.

'सामना'च्या संपादकीयातून भाजपवर टीका केली गेलीय. भाजपनं कवळी सांभाळून राजकारण करावं असं सामनामध्ये लिहिलंय. एकूणच भाजप-शिवसेनामधले संबंध बिघडतच चाललेले दिसतायत.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 10:29 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close