S M L

...तोपर्यंत युतीची चर्चा नाही,सेना शिलेदार भडकले

Sachin Salve | Updated On: Jan 20, 2017 12:04 AM IST

Yuti charcha banner12119 जानेवारी :  मुंबईत युतीच्या चर्चेला आता नाट्यमय वळण लागलं. भाजपचे आमदार आशिष शेलार, खासदार किरीट सोमय्यांच्या टीकेनं शिवसेना नेते नाराज झाले असून  भाजपशी युतीची चर्चा करण्यास नकार दिलाय. सेना नेत्यांनी तशी नाराजी उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवली आहे.

एकीकडे युतीसाठी जोर बैठका सुरू असताना भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. एका परिवाराकडे किती वेळा सत्ता द्यायची अशी टीका करत पालिका माफियामुक्त करणार अशी टीका सोमय्यांनी केली. तर आशिष शेलारांनी प्रॅापटी कराचा मुद्दा आमचाच होता सेनेनं तो हायजॅक केला असा आरोप शेलारांनी केला.

शेलार आणि सोमय्यांच्या वेगळ्याभूमिकेमुळे सेना नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत 'मातोश्री'वर धाव घेतली.अनिल देसाई, अनिल परब आणि रवींद्र मिर्लेकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

अशा स्थितीत चर्चा होणार नाही. जोपर्यंत ही लोकं टीका थांबवत नाही तोपर्यंत चर्चा होणार नाही अशी नाराजी सेना नेत्यांनी व्यक्त केली. असंच असेल तर फडणविसांनी थेट उध्दव ठाकरेंशी चर्चा करावी असंही सेना नेत्यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 12:04 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close