इटलीमध्ये हिमप्रपात, 30 जण बेपत्ता

इटलीमध्ये हिमप्रपात, 30 जण बेपत्ता

  • Share this:

itly419 जानेवारी : मध्य इटलीमध्ये झालेल्या हिमप्रपातामुळे 30 जण बेपत्ता झाल्याची घटना घडलीय. मध्य इटलीमधल्या हॉटेल रिगोपियानोच्या वरच्या बाजूला हिमकडे कोसळले. हॉटेल रिगोपियानो बर्फाच्छादित प्रदेशात आहे. हिमकडे कोसळल्यामुळे तीन मजली हॉटेलवर पूर्णपणे बर्फाचे ढिगारे जमले. याठिकाणी अजूनही बचावकार्य सुरू आहे. इटलीमध्ये भूकंपामुळे हा हिमप्रपात झाल्याचा अंदाज आहे.

मध्य इटलीमध्ये सुरू असलेल्या बचावकार्यात बर्फाच्या ढिगाऱ्याखालून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला तर दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आलं. पण या नैसर्गिक आपत्तीत अनेक जण मृत्युमुखी पडल्याची भीती आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. इटलीमधल्या या डोंगराळ भागाला भूकंपाचे चार तीव्र धक्के बसले. यामुळेच हा हिमप्रपात झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2017 10:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading