अटीतटीच्या लढतीत भारताचा इंग्लंडवर विजय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 20, 2017 12:07 AM IST

अटीतटीच्या लढतीत भारताचा इंग्लंडवर विजय

india_win19 जानेवारी : युवराज सिंग आणि महेंद्र सिंग धोणीच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर उभारलेला 381 धावांचा डोंगर अखेरच्या क्षणापर्यंत गोऱ्यासाहेबांना काही सर करता आला नाही. अवघ्या 15 धावांनी भारताने इंग्लंडला पराभूत करत मालिकेत 2-0ने आघाडी घेतली.

कटक इथं इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवराज सिंगने तब्बल सहा वर्षांनंतर दमदार कमबॅक करत दीड शतक ठोकलं. 127 बॉलमध्ये युवराजने 150 धावा उभ्या केल्या.  युवराजने आपली आक्रमक खेळी करत सहा वर्षानंतर हे त्याचं 14वं शतक ठोकलं.   त्याने हे शतक उभं करताना धोनीसोबत आक्रमक खेळी केली. युवीने 21 चौकार आणि 3 षटकार ठोकले.30 धावांवर 3 विकट गमावलेल्या भारतीय संघांचा डाव युवराज आणि धोनीने आपल्या खेळीने सांभाऴला.  कर्णधारपदाची जबाबदारी हलकी झाल्याने धोनीचीही खेऴी बहरली आहे. त्यानेही त्याचं नववं शतक झळकावलं आहे. त्याने 122 बॉलमध्ये 134 धावा उभ्या केल्या. 10चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने त्याने ही खेळी साकारली.दोघांनीही आपल्या संघाला मोठ्या धावा उभ्या करुन दिल्या. भारतीय संघाने 6 विकेट्स गमावून 381 धावांचा डोंगर इंग्लंड संघांसमोर उभा केला आहे.

382 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंग्लंडने चिवट झुंज दिली. इवॅान मार्गनच्या धडाकेबाज शतकी खेळीमुळे टीम इंग्लंडने तीनशे धावांचा टप्पा पार केला. मॅार्गनने सर्वच भारतीय गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. अखेरच्या तीन ओव्हर्समध्ये सामना भारताच्या हातातून निसटतो की काय अशी पाल चाहत्यांच्या मनात चुकचूकली. पण, धाव घेण्याच्या घाईत ब्रुमराने मॅार्गनला धावचीत केलं. मॅार्गन बाद झाल्यामुळे भारतीय चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. अखेरच्या दोन ओव्हर्समध्ये टीम इंग्लंडने नांगी टाकली आणि भारताने मालिका खिश्यात घातली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2017 11:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...