शिवसेना भाजपचे मुद्दे हायजॅक करते -आशिष शेलार

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 20, 2017 12:29 PM IST

शिवसेना भाजपचे मुद्दे हायजॅक करते -आशिष शेलार

ashish_shelar

19 जानेवारी : 500 स्कवेअर फुटांच्या घरांना कर माफ करणार असल्याची घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पण, ही घोषणा आमच्याच जाहीरनाम्यातली आहे असा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या घोषणेवर टीका केली. शिवसेनेच्या जाहिरनाम्यातील प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दाही आधी भाजपनेच मांडलेला असल्याने सेनेने आपला मुद्द हायजॅक केल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्रपणे लढलेली 2014 ची विधानसभा निवडणूक हीच पहिली निवडणूक असल्याने जनमताचा कौल कुठल्या बाजूने आहे ते याच निवडणुकीवरून स्पष्ट होतंय. त्यामुळे युतीसाठी आधार म्हणून 2012 च्या महानगरपालिकेऐवजी 2014 ची विधानसभा निवडणूकच योग्य आधार असल्याचं मत आशिष शेलार यांनी व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2017 07:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...