Elec-widget

एकाच परिवाराला किती दिवस सत्ता द्यायची ?, सोमय्यांचं 'मातोश्री'ला आव्हान

एकाच परिवाराला किती दिवस सत्ता द्यायची ?, सोमय्यांचं 'मातोश्री'ला आव्हान

  • Share this:

kirt_somiya_vs_sena19 जानेवारी : मुंबई महापालिकेत एकाच कुटुंबाची आणि पक्षाची सत्ता किती दिवस सहन करायची असा सवालच भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी उपस्थित करुन थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं.  मुंबई महापालिकेत युती माफियामुक्त मुंबई, पारदर्शक कारभार या मुद्द्यांवरच होणार असल्याचंही सोमय्यांनी सांगितलं.

एकीकडे युतीसाठी बैठका सुरू आहे तर दुसरीकडे भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे यांना दिलेल्या मुलाखतीत थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मुंबई महापालिकेतली सर्व जबाबदारी सेनेची आहे.  आमची भूमिका मदत करण्याची आहे. सेना म्हणते आवाज कुणाचा तर सेनेचा, मग आमच्याकडे बोट कशाला असा टोला सोमय्यांनी लगावला.

आम्ही वर्षभरापासून कारभार सुधारण्यासाठी सांगत होतो पण पालिकेच्या कारभारात सुधारणा नाही. उलट रस्ते घोटाळा केला. जिकडे तिकडे खड्डेच झाले आहे. मुंबई खड्डामुक्त कधी होणार आहे असा सवाल करत मुंबई माफियामुक्त करणार असा नाराच सोमय्यांनी दिला.

युती झाली तर आमच्याच अटीवर होईल. खड्डे, घोटाळे,भ्रष्टाचारशी युती होणार नाही असंही किरीट सोमय्यांनी ठणकावून सांगितलं.

Loading...

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या निवडणुकींना सामोरे जाणार असल्याचंही किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2017 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...