इतर पक्षांचे चांगले उमेदवार हायजॅक करा, भाजपचा आमदारांना आदेश

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2017 06:27 PM IST

bjp-pradarshan19 जानेवारी : इतर पक्षांत चांगले उमेदवार असतील तर हायजॅक करा असे आदेशच भाजपनं मुंबई आमदारांना दिल्याचं कळतंय. तसंच बंडखोरांवर विशेष लक्ष देण्याचे आदेशही देण्यात आले आहे. भाजप संसदीय मंडळाची बैठक सुरू आहे. या बैठकीत युतीबाबतही चर्चा झाली.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या युतीसाठी भाजप आणि शिवसेनेत युतीसाठी बैठक सुरू आहे. मात्र दुसरीकडे भाजपची आज मुंबईत संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत युतीची चर्चा पार पडली.

या बैठकीत इतर पक्षांचे चांगले उमदेवार असतील तर त्यांना हायजॅक करा असे आदेशच मुंबईतील आमदारांना देण्यात आले आहे.

दरम्यान,शिवसेना नेत्यांची, माफियांची नोटबंदीमुळे नाकाबंदी झाली आहे. चुनावी घोषणा बद्दल बोलायचं तर यांनी एवढे वर्ष काय केलं? घोषणाच दिल्या ना. माफियाशी चर्चा होऊ शकत नाही. माफिया बंदी, पारदर्शकता आणि भाजप राज्यात, केंद्रात मोठा पक्ष आहे हे मानावं मग सोबत येऊ शकतात अशी टीका भाजपचे आमदार किरीट सोमय्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2017 06:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...