युवी-धोणीची 'दंगल', 381 धावांचा उभारला डोंगर

 युवी-धोणीची 'दंगल', 381 धावांचा उभारला डोंगर

  • Share this:

dhoni_and_yvi19 जानेवारी : कटक येथे इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवराजने दमदार दीडशतक ठोकलं आहे. 127बॉलमध्ये युवराजने 150 धावा उभ्या केल्या आहेत. तब्बल सहा वर्षांनंतर युवराजने शतक ठोकून टीकाकारांचं तोंड बंद केलंय. युवराज आणि धोनीच्या शतकीखेळीच्या बळावर भारताने 381 धावांचा डोंगर उभा केलाय.

कटक येथे चालु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवराजने दमदार दीडशतक ठोकलं आहे.127बॉलात युवराजने 150 धावा उभ्या केल्या आहेत.बऱ्याच दिवसांनी युवराज देशाचं नेतृत्त्व करत आहे आणि त्याचं हे दमदार शतक त्याच्या जोरदार कमबॅकची शाश्वती देतंय.युवराजने आपली आक्रमक खेळी करत सहा वर्षानंतर हे त्याचं 14वं शतक ठोकलं.त्यांमुळे त्याचं महत्त्व वाढलंय. त्याने हे शतक उभं करताना धोनीसोबत आक्रमक खेळी केली.दरम्यान त्याने 21 चौकार आणि 3 षटकार ठोकले.

30 धावांवर 3 विकट गमावलेल्या भारतीय संघांचा डाव युवराज आणि धोनीने आपल्या खेळीन सांभाऴला.युवराजनं त्याच्या एकदिवसीय खेळीतील सर्वोच्च धावसंख्या उभी केली.दरम्यान कर्णधारपदाची जबाबदारी हलकी झाल्याने धोनीचीही खेऴी बहरली आहे. त्यानेही त्याचं नववं शतक झळकावलं आहे. त्याने 122 बॉलमध्ये 134 धावा उभ्या केल्या. 10चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने त्याने ही खेळी साकारली.

दोघांनीही आपल्या संघाला मोठ्या धावा उभ्या करुन दिल्या. भारतीय संघाने 6 विकेट्स गमावून 381 धावांचा डोंगर इंग्लंड संघांसमोर उभा केला आहे. इंग्लडकडून क्रिस वोक्स याने 10 ओवर्समध्ये 4 मोठ्या विकेट्स काढल्या. पैकी 3 ओव्हर्समध्य़े त्याने फलंदाजांना एकही धाव घेऊ दिली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2017 05:42 PM IST

ताज्या बातम्या