एलन डिजेनर्सच्या शोमध्ये दीपिका राॅक्स!

एलन डिजेनर्सच्या शोमध्ये दीपिका राॅक्स!

  • Share this:

deepika-11

19 जानेवारी : दीपिका पदुकोण ट्रिपल एक्स रिटर्न आॅफ झँडर केज सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोचली काॅमेडियन एलन डिजेनर्सच्या शोमध्ये. या शोमध्ये प्रियांका चोप्रापासून तिच्या हाॅलिवूड डेब्यूपर्यंत तिनं मनमोकळ्या गप्पा मारल्या.

एलननं दीपिकाला तिच्या वडिलांबद्दल-प्रकाश पदुकोणबद्दल विचारलं. दीपिकानंही अभिमानानं आपल्या वडिलांबद्दल सांगितलं. ती म्हणाली, 'ज्या दिवसात लोक डाॅक्टर,इंजिनीयर व्हायला पाहायचे, त्याकाळात माझे वडील देशासाठी बँडमिटन खेळायचे.'

123

दीपिका म्हणाली, 'माझ्या वडिलांनी मला तुला जे आवडेल ते कर असं सांगितलं होतं. मी 16व्या वर्षीच मला अभिनेत्री व्हायचंय हे ठरवलं होतं.'

आपला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी दीपिकानं आईकडे 10 हजार रुपये उसने मागितले होते. दीपिकाच्या सिनेमांबद्दल एलननी तिचं कौतुक केलं. त्यावेळी आपण आपल्या सिनेमांचा ट्रॅक ठेवत नसल्याचं दीपिका म्हणाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2017 12:00 PM IST

ताज्या बातम्या