पाचशे स्कवेअर फुटापर्यंतच्या घरांना कर माफ, उद्धव ठाकरेंचा वचननामा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2017 05:10 PM IST

पाचशे स्कवेअर फुटापर्यंतच्या घरांना कर माफ, उद्धव ठाकरेंचा वचननामा

uddhav_vachannama19 जानेवारी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज मुंबईकरांसाठी जाहीरनामाच प्रसिद्ध केलाय. मुंबईत पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात येणार आहे. तर सातशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केलीये.

एकीकडे शिवसेना आणि भाजपची युतीसाठी बैठकांच्या फेऱ्या सुरू आहे. तर दुसरीकडे आज उद्धव ठाकरे यांनी युतीच्या चर्चेबद्दलचा विषय आपल्याकडे आलाच नाही असं सूचक वक्तव्य केलंय. तसंच जाहीरनामा प्रसिद्ध होण्याआधीच मुंबईकरांसाठी घोषणा केल्या आहे. मुंबईत पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करणार आणि सातशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्यात येणार असल्याचं वचन उद्धव ठाकरेंनी दिलंय.

शिवाय मुंबईकरांना मोफत आरोग्य सुविधाही देण्यात येणार आहे. मुंबईकरांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मात्र शिवसेना मुंबईकरांना कोणत्याही प्रकारचा ताण किंवा त्रास सहन करु देणार नाही असं अभिवचनही उद्धव ठाकरेंनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2017 05:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...