सकारात्मक बोलणी आता होकारात्मक होऊ द्या - उद्धव ठाकरे

  • Share this:

uddhav-dsathackarey4533

19 जानेवारी : शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबतची बोलणी माझ्यापर्यंत आलेली नाही. युतीची बोलणी सकारात्मक असेल, तर होकारात्मक होऊ द्या, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीवरुन विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या पार्श्वभूमिवर मुंबईकरांवर घोषणांचा पाऊस पाडला आहे.

500 फूटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात येणार असून, 700 फूटांच्या घरांच्या मालमत्ता करांमध्ये सवलत देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. याबरोबरच मुंबईकरांना मोफत आरोग्य सेवा देण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी मी जे बोलतो हे करुन दाखवतोच, असं सांगायलाही विसरले नाहीत.

दरम्यान, युतीची बोलणी माझ्यापर्यंत आलेली नाही. बोलणी आल्यानंतर त्यावर बोलेन. मी थांबलोय तुम्ही पण थांबा असे म्हणत उद्धव ठाकरेंनी युतीबाबत बोलण्याचे सपशेल टाळले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 19, 2017, 3:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading