कोर्टाच्या निकालानंतर सलमाननं मानले जनतेचे आभार

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2017 12:46 PM IST

कोर्टाच्या निकालानंतर सलमाननं मानले जनतेचे आभार

salmantweet

19 जानेवारी : सलमान खानसाठी कालचा दिवस खूप महत्त्वाचा होता. त्याच्या डोक्यावर असलेलं १८ वर्षापासूनच ओझं काल हलकं झालं. काल जोधपुरच्या सत्र न्यायालयाने त्याच्यावर चालू असलेल्या काळवीट शिकार आणि शस्त्र बाळगल्याप्रकरणीच्या खटल्यावर फैसला सुनावला. त्यात त्याला निर्दोष म्हणून सोडून देण्यात आलं. या निकालानंतर तो जेव्हा कोर्टाबाहेर पडला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. त्याने आपला आनंद आपल्या चाहत्यांशी शेअर केला.

त्याने ट्विटरवर म्हटलंय की, 'तुमचं समर्थन आणि सदिच्छांसाठी सर्वांचे आभार.'

त्याच्या या केसची सुनावणी चालू असताना कोर्टाबाहेर त्याच्या चाहत्यांची खूप गर्दी झाली होती. जिकडे सलमान तिकडे गर्दी हे समीकरण तर त्रिकाल सत्य आहे. कोर्टाचा त्याच्या बाजूनं लागलेला हा निकाल ऐकून त्या सगळ्यांनी मोठ्याने आनंद साजरा केला.

१९९८मध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाचं शूटिंग लुणी ठाणे क्षेत्रात काकाणी गावाच्या हद्दीजवळ चालू होतं. त्यावेळी दोन काळ्या हरणांची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. याचदरम्यान वन विभागाने सलमानवर अवैध शस्त्र वापरण्याचा आणि त्याने शिकार केल्याचा खटला दाखल होता. ही केस आर्म अॅक्टअंतर्गत चालू होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2017 09:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...