S M L

प्रियांकाला पुन्हा एकदा पिपल्स चाॅइस अॅवाॅर्ड

Sonali Deshpande | Updated On: Jan 19, 2017 12:29 PM IST

प्रियांकाला पुन्हा एकदा पिपल्स चाॅइस अॅवाॅर्ड

19 जानेवारी:गोल्डन ग्लोबच्या चमकत्या कार्यक्रमात प्रियांका चोप्रा उठून दिसली होती आणि आता अजून एक महत्त्वाचा पुरस्कार तिला मिळालाय. तिच्या क्वांटिकोमधल्या भूमिकेसाठी तिला पिपल्स चाॅइस अॅवाॅर्ड मिळालाय.

तिची स्पर्धा अभिनेत्री व्हिओला डेविस,केरी बाॅशिंग्टन, एलक पँपो यांच्याशी होती. पण फॅन्सची पसंती प्रियांकाला मिळाली.

प्रियांकाचा हा पहिला अॅवाॅर्ड नाही. गेल्या वर्षी क्वांटिकोसाठीच तिला फेवरेट आर्टिस्टचा अॅवाॅर्ड मिळाला होता.

पुरस्कार स्वीकारताना तिनं फॅन्सचे आणि सहकलाकारांचे आभार मानले. शिवाय तिच्यासोबत ज्या अभिनेत्रींची नाॅमिनेशन्स होती, त्यांनी आपल्याला प्रभावित केल्याचं तिनं म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2017 09:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close