इराॅस थिएटरला सील,कर्मचाऱ्यांचा शंभर कोटींचा पगार थकवला

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2017 01:06 PM IST

इराॅस थिएटरला सील,कर्मचाऱ्यांचा शंभर कोटींचा पगार थकवला

EROS CROMA copy

19 जानेवारी : मुंबईतलं आयकॉनिक इरॉस थिएटर अखेर सील करण्यात आलंय. ज्या खंबाटांच्या मालकीचं इरॉस थिएटर आहे, त्यांनी कर्मचाऱ्यांचा शंभर कोटींचा पगार थकवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. प्रशासनानं आणि सरकारनं वेळोवेळी सूचना देऊनही थिएटर कर्मचाऱ्यांना पगार दिला गेला नाही म्हणून अखेर इरॉस थिएटर सील करण्यात आलंय.

इरॉस थिएटर हे मुंबईत 1938 साली सुरू झालं, त्यामुळे बॉलिवूडच्या वाढत गेलेल्या विस्ताराचं इरॉस हे साक्षीदार आहे. इरॉसची मालकी खंबाटांकडे आहे. त्यांच्याच मालकीची खंबाटा एव्हीएशनही आहे. ह्या दुसऱ्या कंपनीत जवळपास 2 हजार 700 कर्मचारी आहेत आणि त्यांचा पगारही गेल्या वर्षभरापासून थकलेला आहे.

इरॉसचं प्रकरण काय आहे?

    Loading...

  • 1938 साली इरॉस थिएटर सुरु झालं, मुंबईकरांच्या आठवणींशी जोडलं गेलंय इरॉस
  • 78 वर्षानंतरही इरॉस मुंबईकरांमध्ये प्रसिद्ध खंबाटांच्या मालकिचं आहे इरॉस थिएटर
  • खंबाटा एव्हीएशन अशी आणखी एक कंपनी ज्यात 2700 कर्मचारी काम करतात
  • गेल्या वर्षभरापासून खंबाटा एव्हीएशनच्या कर्मचाऱ्यांचा पगार थकला
  • शिवसेना आणि अंजली दमानियांनी खंबाटाच्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा उचलून धरला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2017 11:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...