आणखी किती जणांचे जीव घेणार?, टोलवरच्या आयआरबीच्या अधिकाऱ्यांना सिंधुताईंनी झापलं

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2017 09:54 AM IST

आणखी किती जणांचे जीव घेणार?, टोलवरच्या आयआरबीच्या अधिकाऱ्यांना सिंधुताईंनी झापलं

sidutai5716

19 जानेवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला असून आत्तापर्यंत झालेल्या अपघातांत शेकडो जणांना जीव गमवावा लागला. याच मुद्यावरून ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ संतप्त झाल्या असून त्यांनी थेट आयआरबीच्या अधिकाऱ्यांना चांगलचं धारेवर धरलं आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस आणखी कितीजणांचे जीव घेणार ?, असा संतप्त सवाल सिंधुताई यांनी टोलनाक्यावरील आयआरबीच्या कर्मचाऱ्यांना विचारला.

काल रात्री सिंधूताई मुंबईहून पुण्याला जात असताना त्यांच्या डोळ्यांसमोरच एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात होता होता टळला. या गाडीमध्ये जवळपास वीस महिला आणि लहान मुले होती. ही घटना पाहून सिंधुताई सपकाळ संतापल्या आणि तळेगावजवळच्या उर्से टोलनाक्यावरील टोल कर्मचाऱ्यांना झापलं.

'नागरिक एवढे पैसे भरतात, तरीही तुम्ही त्यांना चांगली व्यवस्था देऊ, सुरक्षित प्रवास देऊ शकत नाही. आत्तापर्यंत अनेकांचे जीव गेले आहेत' अशा शब्दांत त्यांनी कर्मचाऱ्यांना सुनावले एवढेच नव्हे तर त्यांनी आयआरबी अधिकाऱ्यांनाही फोन करून फैलावर घेतले. ' आणखी किती प्रवाशांचा जीव घेणार आहात?' असा खडा सवाल संतप्त सिंधूताईंनी अधिकाऱ्यांना विचारला.

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येत्या आठ दिवसांत योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर हजारो लोकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करेन, असा इशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे केंद्र सरकारचा रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू असतानाच ही घटना घडली असून सिंधुताईंच्या इशा-यानंतर तरी काही सुधारणा होते का हे पुढील काळात बघावे लागेल.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2017 09:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...