राजन तेलींच्या मुलावर हल्ला केल्या प्रकरणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल

राजन तेलींच्या मुलावर हल्ला केल्या प्रकरणी नितेश राणेंवर गुन्हा दाखल

  • Share this:

Rane VS Teli

19 जानेवारी :  काँग्रेस नेते नारायण राणे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस असलेले राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश याच्यावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री उशिरा मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात प्रथमेशवर हल्ला करण्यात आला होता. फलाट क्रमांक ५ वर कोकणकन्या एक्स्प्रेसच्या ए-१ बोगीत प्रवेश करत असतानाच दोघा हल्लेखोरांनी त्याला खाली खेचून बेदम मारहाण केली होती. दरम्यान, हे हल्लेखोर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना प्रवीण खरात या हल्लेखोराला पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं होतं.

दरम्यान, हा हल्ला नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्या इशाऱ्यावरून करण्यात आला आहे, असा प्रथमेशचा आरोप असून त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी नितेश तसेच अन्य पाच जणावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी फलाट क्रमांक ५ वरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून दुसरा हल्लेखोर लवकरच सापडेल, असं सांगण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 19, 2017, 8:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading