औरंगाबादेत भाजपच्या नेत्याची गुंडागर्दी, नंगी तलवार घेऊन नागरिकाचा पाठलाग

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 19, 2017 12:02 AM IST

औरंगाबादेत भाजपच्या नेत्याची गुंडागर्दी, नंगी तलवार घेऊन नागरिकाचा पाठलाग

 abad_bjp

18 जानेवारी : औरंगाबादमध्ये कालच दोन गुंडांना प्रवेश देऊन शुद्धीकरण करण्यात आलं. आणि आज भाजपचा एक गुंड नेता नागरिकाच्या मागे नंगी तलवार घेऊऩ धावतांना कॅमेऱ्यात कैद झालाय.

एकेकाळी भाजप इतर पक्षांना गुंडांचा पक्ष म्हणून आरोप करीत होती. मात्र भाजप सत्तेवर आल्यापासून भाजपमध्ये गुंडांची इन्कमिंग काही थांबता थांबेना...पुण्यानंतर औऱंगाबादेतही भाजपनं सिल्लोड मध्ये ठगण पाटील नावाच्या गुंडाला कालच पक्षात प्रवेश केला. आता आज अत्यंत धक्कादायक प्रकार उघड झालाय.

भाजपचा एक कार्यकर्ता चक्क नागरिकाची हत्या करण्यासाठी हातात तलवार घेवून पाठलाग करतानाचा प्रकार उघड झालाय. भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचा अध्यक्ष हाफीज शेख नावाचा गुंड भर दुपारी जवाहर कॅालनी भागामध्ये हातात तलवार नंगी घेवून रस्त्यावर धावतांना दिसतो आहे.

भाजपच्या कार्यकर्त्याचा हा हैदौस सीसीटीव्हीत कैद झालाय सुदैवानं ज्याची हत्या करण्यासाठी भाजपचा हा कार्यकर्ता मागे लागला त्याला नागरिकांनी मध्यस्थी करून वाचवले. या सर्व प्रकारामुळे पोलिसांनी आरोपीला अटकेचा प्रयत्न केला. मात्र आरोपी फरार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2017 12:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...