दारु माफियाचा पराक्रम, वाॅटर फिल्टरमध्ये भरले 863 दारूचे बाॅक्स

दारु माफियाचा पराक्रम, वाॅटर फिल्टरमध्ये भरले 863 दारूचे बाॅक्स

  • Share this:

chandwad_daru4318 जानेवारी : गुन्हेगार काय शक्कल लढवू शकतो याचा नेम नाही.  वॉटर फिल्टरच्या बॉक्समध्ये चक्क दारू लपवून चालवलेला दारुसाठा पोलिसांनी जप्त केलाय.तब्बल ८६३ विदेशी दारूचे बॉक्स राज्य उत्पादक शुल्काच्या पथकाने मुंबई-आग्रा रोडवर सापळा रचून पकडले.या दारूची किंमत ७० लाख रुपये आहे.

मुंबई-आग्रा हायवेवर चांदवडजवळ लुधियाना येथून मुंबईला विदेशी बनावट दारूची तस्करी करण्यासाठी दारू माफियांनी चक्क ज्या वॅाटर फिल्टर मशिनचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी केला जातो त्याच वापर त्यांनी दारूचे बॉक्स लपविण्यासाठी केला.या माफियांनी एका ट्रकमध्ये ही वॅाटर फिल्टर मशिन ठेऊन त्यात तब्बल ८७३ महागड्या विदेशी दारूचे बॉक्स लपविले होते. या दारूची किंमत सुमारे ७० लाख रुपये आहे.

मात्र राज्य उत्पादक शुल्काच्या अधिकाऱ्यांना याची गुप्त माहिती मिळाली होती. मुंबईच्या भरारी पथकाने चांदवड जवळ सापळा रचून हा ट्रक पकडला. या ट्रकमध्ये ठेवण्यात आलेले वॅाटर फिल्टर  मशिन उघडण्यात आल्यानंतर त्यात रॉयल स्टैग,रॉयल चैलेंज या सह इतर विदेशी कंपनीची बनावट दारूचे बॉक्स आढळून आले. उत्पादक शुल्काच्या अधिकाऱ्यांनी ट्रक,दारूचे बॉक्स असा एक कोटी ५६ हजाराचा माल जप्त करून या प्रकरणी वाहनचालकाला अटक करून त्याच्या विरोधात मालेगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 09:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...