18 जानेवारी : मुंबईतल्या एसएनडीटी विद्यापीठात मुलींसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. पारदर्शक आणि तोकडे कपडे घालू नका, अशा सूचना मुलींना देण्यात आल्यायत असं एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांनी सांगितलंय.
यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. पण मुलींचा ड्रेसकोड अमुकच असावा, असा काही निर्णय घेतलेला नाही, असंही वंजारी यांनी सांगितलंय.
जीन्स, टी शर्ट, पंजाबी ड्रेस आणि फॅशनेबल कपडेही मुली घालू शकतात. कुठल्या रंगाचे कपडे घालावे यावरही बंधन घालण्यात आलेलं नाही, असं स्पष्टीकरण डॉ. शशिकला वंजारी यांनी दिलंय. कुणी टीका करतंय म्हणून निर्णय मागे घेणार नाही, असंही त्या म्हणाल्या.
एसएनडीटीच्या मुलींनी तोकड्या कपड्याचा निर्णय अयोग्य आहे, अशी तक्रार केली तरच निर्णय मागे घेतला जाईल, असं मात्र डॉ. शशिकला वंजारी यांनी म्हटलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा