बापाला पाहताच मुलानं मृत्यूला कवटाळलं !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 18, 2017 07:41 PM IST

बापाला पाहताच मुलानं मृत्यूला कवटाळलं !

  kolhapur_father_Dead

18 जानेवारी : जन्मठेपेतून सुटलेल्या वडिलांना घेण्यासाठी आलेल्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडलीय.

४० वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या वडिलांना नेण्य़ासाठी साजिद हसन मकवाना हा तरुण कोल्हापुरात आला होता. शिक्षा भोगून सुटलेल्या वडिलांना पाहताच साजिदला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. दुपारी १ वाजता मुळचा मुंबईचा हसन मकवाना हा जेलमधून बाहेर पडला. २४ वर्षांनी जेलबाहेर आलेल्या हसननं कारागृहाला नमस्कार केला आणि कुटुंबियांच्या दिशेनं चालला. रस्त्याच्याकडे त्याचा मुलगा आणि इतर नातेवाईक उभे होते.

अनेक वर्षांची ताटातूट संपून एकदाचे वडील घरी परतणार याचा आनंद साजिदच्या चेहऱ्यावर झळकत होता. हसन मकवाना जेलमधून बाहेर येताच मुलगा साजिदने त्यांना कडकडून मिठी मारली. दोघांनाही अश्रू आवरता आले नाहीत. हुंदके देतच हे एकमेकांशी संवाद साधत होते. काही वेळाने साजिदच्या छातीत तीव्र कळ आल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. वडिलांनी त्याला तातडीने खासगी वाहनातून उपचारासाठी रुग्णालयात दखल केले, मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 07:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...