S M L

सेना-भाजपचा नुसताच टाईमपास !

Sachin Salve | Updated On: Jan 18, 2017 09:29 PM IST

सेना-भाजपचा नुसताच टाईमपास !

 उदय जाधव, मुंबई.

18 जानेवारी : शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची, युती संदर्भातली दुसरी बैठक आज संपली. आणि या बैठकीतही प्रत्यक्ष जागावाटप बाबत चर्चा झाली नाही. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केलेले दोन्ही पक्ष फक्तं टाईमपास बैठका घेत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या 'टाईमपास २' बैठकीचा हा एक रिपोर्ट.

Yuti charcha banner121राज्यातल्या १० महापालिका आणि २५ जिल्हापरिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकीतून ठोस निर्णयावर चर्चाच होत नसल्याचं समोर येतेय. फक्तं प्राथमिक चर्चा आणि पारदर्शक व्यवहार यावरच चर्चा होतेय. त्यामुळे जागावाटप संदर्भात चर्चा होत नाहीये.युतीच्या पहिली बैठकीतही अशीच प्राथमिक चर्चा झाली. पण मुंबई महापालिकेतील २२७ वॉर्डसंदर्भात  चर्चा कधी करणार हा प्रश्न अजूनतरी अनुत्तरितच आहे.

दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून चालढकल केली जातेय हे तर  स्पष्टपणे दिसतंय. तसंच दोन्ही पक्षांकडून काही बातम्या पसरवल्याही जात आहेत. पण दोन्ही पक्षातील नेते याबद्दल स्पष्टीकरणही देत नाहीत. त्यामुळे या बैठकांमध्ये युतीबाबत चर्चा होतीये की फक्त टाईमपास सुरु आहे असा प्रश्न विचारला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 07:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close