मुंबई महापालिकेत काँग्रेसचीच सत्ता येणार, कृपाशंकर सिंहांचा दावा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 18, 2017 05:40 PM IST

मुंबई महापालिकेत काँग्रेसचीच सत्ता येणार, कृपाशंकर सिंहांचा दावा

kripa_Shankar_singh18 जानेवारी : मुंबई महापालिकेत काँग्रेसचीच सत्ता येणार असा दावा काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी केलाय. मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

आज मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उत्सुक उमेदवारांच्या सध्या मुलाखती मुंबईच्या विविध ठिकाणी सुरु आहेत. कालही काही उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. उत्तर मध्य मुंबईच्या मुलाखती वांद्रे पश्चिम येथे सुरु आहेत. काँग्रेस नेत्या प्रिया दत्त, बाबा सिद्दीकी, कृपाशंकर सिंह, कृष्णा हेगडे आदी नेते या मुलाखती घेत आहेत.

येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्ताधारी होणार असल्याचा दावा  कृपाशंकर सिंग यांनी केलाय. शिवसेना आणि भाजपच्या कारभाराला जनता कंटाळली असून जनतेत सत्ताधाऱ्यांविषयी राग असल्याचंही सिंह यांनी म्हटलंय.

संजय निरुपम यांच्या नेतृत्वाबद्दल काय वाद होत असल्याबद्दल प्रश्न विचारला असता सिंह यांनी काँग्रेसमध्ये कोणा एकाचं नेतृत्व नाहीये काँग्रेस पक्ष म्हणून नेतृत्व आहे असा टोला मारला. पण त्यानंतर लगेच सारावसारव करत माझं मत पक्ष विचारत घेतो असं सिंहांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 05:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...