रणबीरशी माझी मैत्री झाली नाही - ऋषी कपूर

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 18, 2017 05:30 PM IST

रणबीरशी माझी मैत्री झाली नाही - ऋषी कपूर

rishikapoor

18 जानेवारी : ऋषी कपूर सध्या चर्चेत आहेत ते त्यांच्या 'खुल्लम खुल्ला-ऋषी कपूर अनसेंसर्ड' या पुस्तकामुळे. त्यात त्यांनी आपल्या आयुष्याबद्दल बरंच काही लिहिलंय.

ऋषी कपूरनं लिहिलंय की, 'रणबीरसोबतची जनरेशन गॅप कमी करायला मी अयशस्वी झालोय. मी नेहमीच त्याच्याबरोबर एक अंतर ठेवून वागलोय.रणबीरला ते पसंत नाही. त्याला माझ्यासारखं बाप बनायचं नाहीय.'

ऋषी कपूर म्हणतात, 'माझे माझ्या वडिलांसोबतचे संबंध असेच होते.मी त्यांच्याशी कधी वाद नाही घातला.रणबीर आणि माझ्यात प्रेम आणि आदर आहे. त्यामुळे मी रणबीरचा कधी मित्र नाही बनू शकलो.'

पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ते म्हणाले की, 'मी बिझी असायचो, त्यामुळे लहानपणी रणबीर नितूच्या जास्त जवळ असायचा.'

Loading...

'खुल्लम खुल्ला...'च्या प्रकाशनावेळी नितू कपूर आणि मुलगी रिद्धीमा उपस्थित होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 12:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...